Tuesday, 31 March 2020

प्रश्नमंजुषा GK for students

सुट्टीतील उपक्रम प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी
दिनांक 01 एप्रिल 2020 बुधवार

01) सुर्यमंदिर कोठे आहे ?
-------- 

02) विमानाचा शोध कोणी लावला ?
-------- 

03) विसाव्या शतकातील महान शोध कोणता ?
-------- 

04) ताजमहाल कोठे आहे ?
-------- 

05) प्रसिद्ध चारमीनार कोठे आहे ?
-------- 

06) अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?
-------- 

07) छापण्याच्या यंत्राचा शोध केंव्हा लागला ?
-------- 

08) मोनालीसा हे जगप्रसिद्ध असलेले चित्र कोणी काढले ?
--------

09) अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला ?
-------- 

10) अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते ?
-------- 

उत्तरे :- उद्याच्या पोस्टमध्ये
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दिनांक 31 मार्च 2020 प्रश्नमंजुषची उत्तरे :- 
01) मराठी 02) शेती 03) एरूवाक पुन्नम 04) तामिळनाडू 05) वैशाखी 06) ओणम 07) दाल-रोटी 08) कैलकोट्टीकळी 09) कोळीनृत्य 10) गुजरात

Monday, 30 March 2020

प्रश्नमंजुषा GK For Students



प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी
दिनांक 31 मार्च 2020 मंगळवार

बालमित्रांनो, चला रोज दहा प्रश्नांची उत्तरे शोधू या, सुट्टीतला उपक्रम पूर्ण करू या आणि आपली बुद्धिमत्ता वाढवू या. 

( खालील प्रश्न पालकांच्या मदतीने एका वहीत लिहून ठेवावे म्हणजे भविष्यात कामाला येतील. )

01) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ? 

02) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता ? 

03) आंध्रप्रदेश मध्ये प्रसिद्ध असलेले उत्सव कोणते ? 

04) पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ? 

05) पंजाब मध्ये कोणता सण प्रसिद्ध आहे ? 

06) केरळमध्ये कोणता सण उत्साहात साजरा केला जातो ? 

07) पंजाबी लोकांच्या आहारात प्रामुख्याने कोणते पदार्थ आढळतात ? 

08) केरळमध्ये कोणता नृत्य प्रसिद्ध आहे ? 

09) महाराष्ट्रात कोणता नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे ? 

10) गरबा हा नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ? 

उत्तरे :- उद्या पोस्ट होतील. 

Sunday, 29 March 2020

corona टाईमपास शब्दकोडे 04


वरील शब्दकोड्याचे चित्र कागदावर काढा, शब्दसंकेतच्या मदतीने कोडे सोडवा आणि उत्तराची फोटोकॉपी comment करा. 

 *20दिवस फुल्ल टाईमपास*

😂😂😂🤣🤣🤣 

*टाईमपास शब्दकोडे क्र. 04*
 - नासा येवतीकर, 9423625769

आडवे शब्द संकेत
1) भारताचे सध्याचे पंतप्रधान
4) शुर, योद्धा
5) श्रावणबाळाने आपल्या वृद्ध आई-बाबांना यातून यात्रा करविले
8) राक्षस, दानव
9) नाम, जहाज
10) मध्यस्थी, लवाद

उभे शब्द संकेत
1) एका राक्षसाचे नाव
2) राहुल *** , भारतीय क्रिकेटपटू
3) भारताचा राष्ट्रीय पक्षी
6) गणपतीचे नाव, *** विनायक
7) छाया
9) छंद, आवाज